गुरुवार, अक्तूबर 08, 2020

मराठी शायरी प्रेमाची | Marathi Shayari For Love

मराठी शायरी | marathi shayari for love


मराठी शायरी प्रेमाची | Marathi Shayari For Love


मराठी शायरी मध्ये आज मी तुम्हाला marathi shayari for love सांगणार आहे तुम्ही ज्या वेक्ती वर प्रेम करता त्याच्या साठी हे मराठी शायरी प्रेमाची आहे मी इथे तुम्हाला marathi love shayari सांगणार आहे.



प्रेम हे खूप सुंदर अनुभव असते प्रेमाची भाषा फक्त आपलं मन जणू शकतो प्रेम हे कोणावर ही होऊ शकतो जर तुम्हाला ही तुमच्या जीवनात कोणावर प्रेम झाले आहे तर हे love shayari in marathi तुमच्या साठीच आहे. तुम्ही तुमच्या boyfriend, girlfriend जाच्यावर तुम्ही प्रेम करता त्यांच्या सोबत हे मराठी शायरी प्रेमाची तुम्ही share करू शकता 



या पोस्ट मध्ये ज्या love shayari मी तुम्हाला सांगितलो आहे ते तुमच्या लव्ह पार्टनरला खूप आवडणार आहेत. जर तुमचा boyfriend किंवा girlfriend नाराज आहेत तर हे लव्ह शायरी त्याना whatsapp, facebook, msg करून पाठवा आणि तुमच्या friend ला प्रेमात पाडण्यात सुद्धा खूप मदत करतील हे Marathi shayari for love




मराठी शायरी प्रेमाची | love shayari in marathi


भिडते जेव्हा नजरेला नजर 
तेव्हा तुझाच विचार मनात असतो
तू माझ्याशी स्पष्ट कधी बोलशील
मी त्याचीच वाट पाहत बसतो.⁠⁠⁠⁠


जीवन जगता जगता 
एकदाच प्रेम करायचं असतं
तेच प्रेम आयुष्यभरं
मनात जपायचं असतं.


समईला साथ आहे ज्योतीची
अंधाराला साथ असते प्रकाशाची
चंद्राला साथ असते चांदण्याची
प्रेमाला साथ असते फ़क्त दोघांची.


माझ्याकडे बघुन जेंव्हा एखादे फ़ूल हसते 
खरे सांगू त्यात मला तुझे रुप दिसते.


प्रेमाचे गुंतवून धागे दूर 
अशी जाऊ नकोस
मला सुध्दा मन आहे
हे विसरुन जाऊ नकोस.


पटकन हसणे पटकन रुसणे
मोहक तुझी अदा
तुझ्या मोहक सौंदर्यावर
आहे मी मनापासून फ़िदा.


तू मिळाल्यावर सुध्दा 
परमेश्वराचा राग आला
सुंदर दान पदरात टाकयला
त्याने किती उशीर केला...


तु येणार असताना मध्येच 
पावसाचं येणं कळत नाही
पण तुझ्या प्रेमा एवढा त्यात
भिजण्याचा आनंद मिळत नाही.


रातराणी उमलावी तशी उमलतेस
मनापासून दरावळतेस
खरं सांगू का तुला मला तू खूप आवडतेस...


एक मनी आस एक मनी 
विसावा तुझा चंद्र्मुखी
चेहरा रोजच नजरेस
पडावा नाहीतर तो दिवसच नसावा..


मनात दाटले भावनांचे धुके
तुझ्या जिद्दीपुढे हरून
माझे शब्दही झाले मुके....


प्रत्येक शब्द तुझ्यासाठी
प्रत्येक ओळ तुझ्यासाठी
तुझ्या प्रिती मी अश्रु ढाळतो 
तरी सुध्दा माझ्या प्रितीला प्रित कळेना.


पुन्हा एकदा प्रेमात
पडण्याचा विचार आहे
तु एकदा हा बोल मग
आपली सात जन्माची गाठ आहे...


तुला पाहिलं त्याक्षणापासून
रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो
तुझ्याच साठी जगता जगता
माझे जगणे मात्र विसरून गेलो..


सुखासाठी कधी हसावं लागतं
तर कधी रडावं लागतं
कारण सुंदर धबधबा बनायला
पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं..

marathi shayari love for boyfriend


तुझ्या हसण्याची व भोऱ्या केसांची
आठवण मला आहे
शक्यता तुला विसरण्याची
माझ्या मरणात आहे.

marathi shayari love for boyfriend

तू माझा आहेस
असं म्हणताना
मनात काहीस होत
तुला मी माझं म्हटल्याच
मनही गवाही देत...


तुझ्या प्रेमाचा रंग तो
अजूनही बहरत आहे
शेवटच्या क्षणा पर्यंत
मी फक्त तुझीच आहे.


दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडतं
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं..


पाहशील जिथे जिथे नजर उचलून…
मीच असेल उभा ओठांवर स्मित घेऊन 
आलेत कधी जर तुझ्या डोळ्यात दुखांचे अश्रू….


तुला सुखाचे आनंदाश्रू तिथे तिथे देऊन…
मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सूप्त भूक..


मैत्री म्हंटली की
आठवतं ते बालपणं
आणि मैत्रीतून मिळालेलं ते
खरंखुरं शहाणपण.


तिचं ते खोटं बोलणं
बोलताना दूसरी कडेच पाहणं
मधेच खाली पाहून लाजणं
लाजताना मग पुन्हा हसणं..


तुझ्या कवितेतली प्रत्येक ओळ
म्हणजे जगण्यासाठी घेतलेला श्वास
आयुष्य जगायला पुरेसा आहे मला
काही क्षणांचा तुझा लाभलेला सहवास..


हा नशिबाचा खेळ कोणता
कधी कुणाला ना कळला
कुणा मिळती सुलटे फासे
कधी डाव कुणाचा ना जुळला..


किनाऱ्यावर उभे राहून 
फेसाळणाऱ्या लाटा पाहाव्या
दूर क्षितिजावर पोहोचवणाऱ्या
कल्पनेच्या नव्या वाटा पाहाव्या..


नवे स्वप्न रंगवताना
जुन्यांचीही जाणीव असावी
नव्या स्वप्नातील पहाट
दाट धुक्याची नसावी..


संध्याकाळ मावळून गेली 
सुर्यास्त झाल्यावर
आणि काळोख मात्र नटून
बसला चांदण आल्यावर.


कितीही रागावलीस तरी 
मी तुझ्यावर रागावणार नाही
कारण तुझ्याशिवाय 
मी कुणावर प्रेम करणार नाही.


मी आपला येडा खुळा 
बोलतो दिल खुलास
पण जीव जडलाय माझा तुझ्यावर
आहे का तुला त्याचा आभास..

 marathi premachi shayari love sad

marathi shayari love sad

जपण्यासारखं बरचं काही 
उद्यासाठी राखून ठेवलंयं
हृदयाच्या पंखावरती
तुझंच नाव कोरुन ठेवलय.


एकट्या पडलेल्या मनाला 
कोणीतरी आधार देणार हवं
शब्दांना व्यवस्थित मांडून 
कवितेतून आकार घेणार हवं.


हळुवार जपून ठेवलेले क्षण
तेच माझ्या जगण्याची आस आहे
एकेक साठवून ठेवलेली आठवण
तिच माझ्यासाठी खास आहे…


आयुष्य हे एकदाच असते
त्यात कोणाचे मन दुखवायचे नसते
आपण दुसऱ्याला आवडतो
त्यालाच प्रेम समजायचे असते…


खुबी माझ्यात एवढी नाही की
एखाद्याच्या मनात घर करून जाईन
पण विसरणे सुद्धा अशक्य होईल
इतक्या अविस्मरणीय आठवणी देऊन जाईन…


प्रेम त्याच्यावर करावे
ज्याला आपण आवडतो
नाहीतर आपल्या आवडीसाठी
आपण उगाच आयुष्य घालवतो…


सवय लागलीय तुझ्यावर प्रेम
करायची सुटता सुटेना
शेवटी ठरवले विसरून जायचं तुला
पण तुझ्यावाचून जगणं ही जमेना…


शब्द बनून पुस्तकांमध्ये भेटू आपण
सुगंध बनून फुलांमध्ये भेटू आपण
काढशील आठवण माझी जेव्हा
अश्रू बनून डोळ्यांमध्ये भेटू आपण…


प्रेमात जरा रागावल्याशिवाय
प्रेमाला गोडी येणार नाही
आणि रागावून दूर गेल्याशिवाय
त्या भेटीचे महत्व तुला कळणार नाही.


मन तर वारं प्यायलेल्या घोड्यागत
तिच्याच भोवती सारखं धावतयं
स्वप्नात रमलेल्या माझ्या मनास
जागं कसं करावं तेच उमगत नाही...


प्रेम पत्र लिहावे म्हंटल तर
तिला काय म्हणावं सुचत नाही
सुरवातच जिथे होत नाही तर
प्रेम कसं करणार समजत नाही..


आठवणी मध्ये नको शोधु मला...
काळजात मुक्कामी आहे मी तुझ्या...
जेव्हा भेटीची ओढ लागेल तुला
मी भेटेल हृदयाच्या ठोक्यात तुझ्या..


मुसळधार पावसाला मी 
जरासुद्धा घाबरत नाही 
पण तुझा एक आश्रू 
मात्र दुरुनही पाहवत नाही.


नको न जाऊ सोडून तू असे मला..
कि जीव तुझ्यात अडकला आहे..


तू सावरतेस श्वासांना अलवार मनाला..
हा वेडा रोग मनास अचानक जसा जडला आहे..


Marathi shayari love image


marathi shayari love image

तुझ्या डोळ्यात अश्रू येतील असे मी कधीही वागणार नाही 
कारण तुझ्या अश्रूची किंमत मी कधी चुकवू शकणार नाही.


शब्दातून दुःख व्यक्त करता आले असते तर
अश्रुंची गरज भासली नसती
सर्व काही शब्दात सांगता आले असते
तर भावनांना किंमतच उरली नसती..


तुझ्या वर प्रेम करते 
म्हणुनच तुझी काळजी करते
आणि तुझी काळजी आहे 
म्हणुनच तुझ्यावर प्रेम करते..


तुझ्या डोळ्यांना समजावून ठेवं
ते नेहमी मला वेड लावतात...
तसा मी आहे थोडा वेडा
पण ते चारचौघातही वेड लावतात..


प्रेम म्हणजे जणू थंडीतला बेधुंद गार वारा...,
प्रेमाचा स्पर्श होताच अंगावर येणारा शहारा...


तुझ्यासाठी आणलेला गुलाब
तुला पाहुन रुसला होता..
त्याच्या पेक्षा सुंदर कोणीचं नाही,
हा त्याचा डाव फसला होता.......


नको पाहूस माझ्याकडे,
अशा वेगळ्या नजरेने
माझंही मन वेड होईल,
अशा तुझ्या पाहण्याने..


मनात चलबिचल आहे
होकार अन नकाराची
मनातलं ओठावर आणु
का ठेवु माझं मजपाशी..


चांदण्यांच्या मिठीत चंद्र विसावतो
कधी आसमंत कधी अंधार लाजतो..
खरं प्रेम जे तू पाहिलं,
जे मी केलं,
खरं प्रेम जे आता फक्त आठवणीतचं उरलं..


भावना समजायला
शब्दांची साथ लागते
मन जुळून यायला
हृदयाची हाक लागते..


काही नको मला फक्त तुझी साथ हवी..
माझ्या आयुष्यात येण्याची तुझी आस हवी..

थांब जरा तू
बरसू नकोस
ती येणार आहे
तु ही तरसू नकोस..

आहेस तू सोबतीला म्हणून जगण्याची आस आहे,
दिवस रात्र आता फ़क्त तुझाच ध्यास आहे..


तुला खूप वाईट वाटेल,
मला सोडून जाताना
कारण तुझही मन दुखावेल 
माझं मन मोडताना..


तुझ्या डोळयात पाणी येईल, 
असे मी कधीही वागणार नाही,
कारण त्या अनमोल अश्रूंची किंमत मी कधीच चुकवू शकणार नाही..


 love shayari in marathi 


मी तुला जाणले नाही
असं कधीच झालं नाही
माझ्या डोळ्यातली अबोध प्रेम 
तुला कधी कळलच नाही.

love shayari in marathi

तुझ्या मनाचे दार
जेव्हा मी हळूच लोटलं
माझंच प्रतिबिंब
तेव्हा मला भेटलं.....


तूझ्या कुरळ्या केसांना सावरत,
तिरक्या नजरेने पाहिलसं मला...
अन माझ्या मनाला लागलं ध्यास,
आता बनवायचं माझं फक्त तुला...


जवळ तिच्या असताना,
शब्दांना फुटली ना भाषा...
विसरुन जात मन माझं सार,
अशी तिच्या प्रेमाची नशा...


वाटतं माझ्या हळव्या हद्यास,
कुणीतरी असावं प्रेम करणारं...
जणू सागराच्या पाण्यासारखं,
मला स्वतःत खोल सामावणारं....


तुझ्या आठवणींना आठवत,
माझं वेडं मन जगत होतं...
कधीतरी येशील तू जीवनात,
याच आशेवर वाट पाहत होतं...


हिवाळ्यातील हि गुलाबी हवा
सोबत ती हि असावी
घट्ट मारलेल्या मिठीत
शिरण्यास थंडीसही जागा नसावी..


जो पर्यंत सूर्य होणार
नाही थंड
तो पर्यंत तुझ्यावर प्रेम
करणं होणार
नाही माझ्या कडून बंद.


माझी कविता वाचताना 
नेहमी डोळे गळतात 
तिच्या आयुष्याचे धागे म्हणे 
माझ्या जीवनाशी जुळतात


फुल व्हायला कळी व्हावं लागतं 
आणि प्रेम करायला जन्माला यावं लागतं..


तुझ्यावरचे  प्रेम व्यक्त करणं,
मला काही जमत नाही
तुझ्या आठवणी शिवाय,
मन मात्र कशात रमत नाही..


नेहमी लोक म्हणतात कि जगलो तर भेटू,
पण तुला पाहिल्यापासून सारखं वाटत आहे कि 
आपण भेटत राहिलो तरच जगू.


तुझ्यानंतर ह्या जगातील
दुसरी मुलगी जिच्यावर
मी जीवापाड प्रेम करेन
ती आपली मुलगी असेल...


बर्फासारख्या थंडी मध्ये,
तुझ्या मिठीत लपावसं वाटतं
एका जन्माचं आयुष्य,
एका क्षणात जगावसं वाटतं..


मला तुझं हसणं हवं आहे
मला तुझं रुसणं हवं आहे
तु जवळ नसतानाही
मला तुझं असणं हवं आहे⁠⁠⁠⁠...


प्रेमात नसते कधी शिक्षा
प्रेमच घेत राहते प्रेमाची परीक्षा
करून तर बघा निस्वार्थी मनाने
उगाच कशाला ठेवता मनात अपेक्षा..


जिव्हाळा माझा मनातला
केव्हाच कळलं होता मला
मैत्री अबाधित राहावी
म्हणून आवरले मी मला....


आज काल स्वप्नांनाही 
तुझीच सवय झाली आहे,
जगण्याला ही माझ्या
काहिशी रंगत आली आहे.


तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय 
की मलाच मी सापडत नाही,
एकटा शोधावा म्हटलं
पण तुझ्याशिवाय काहीच
सापडत नाही.


तुझं हसणं आणि माझं फ़सणं 
दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन
तुझ्या प्रेमात पडलं.


मित्रानो या पोस्ट मध्ये मी तुम्हाला मराठी शायरी सांगितले आहे या मध्ये marathi shayari for love या विषयावर 80+ लव्ह शायरी मराठी मध्ये सांगितले गेले आहे याला आपण मराठी शायरी प्रेमाची असे सुद्धा म्हणतो.